MPSC 20 MCQ At 9 PM Speed Test 1

10 Questions | Total Attempts: 317

SettingsSettingsSettings
Speed Quizzes & Trivia

एकूण प्रश्न:-10 वेळ:- 6 मिनिटे *सूचना* खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. 1. ही टेस्ट फक्त GOOGLE CHROME या BROWSER मध्येच सोडवा. 2. आज आपला पहिला दिवस असून चांगल्या दर्जाचे फक्त 10 प्रश्न आपण सोडविण्यासाठी दिले आहेत. 3. उद्यापासून आपण 20 प्रश्नांची टेस्ट घेणार आहोत. 4. सध्या भरपूर विद्यार्थी १३ मे २०१८ रोजी होणाऱ्


Questions and Answers
 • 1. 
  प्र.1. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटीश सरकारला मदत करायची कि नाही या संदर्भात कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक वर्धा येथे झाली, मात्र प्रथम बैठकीत येथे मतभेद झाले त्याबाबत खालील विधाने लक्षात घ्या. अ. पंडित नेहरूंच्या मते नाझीवाद हा जगाला धोका आहे. ब. इतर समाजवादी नेत्यांच्या मते स्वातंत्र्यासाठी ब्रिटनवरील संकटाचा फायदा घेऊ नये. क. दोस्त दोस्त राष्ट्रांना मदत करावी या गांधीजीच्या मताला सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांच्या व्यतिरिक्त सर्वांनी विरोध केला. वरीलपैकी असत्य विधाने कोणती ? 1. फक्त ब 2. फक्त क 3. फक्त ब आणि क 4. फक्त अ आणि ब
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 2. 
  प्र.2. राष्ट्रीय कॉंग्रेसचे २९ मार्च १९३१ कराची अधिवेशन विशेषपणे गाजले, त्याबद्दल खालीलपैकी काय खरे नाही ? 1. या अधिवेशनात राजकीय हिंसाचार कॉंग्रेसला अमान्य असल्याचे कारण देत भगतसिंग व सहकाऱ्याचे बलिदानाची प्रशंसा केली नाही. 2. या अधिवेशनात गांधी आर्यवीन कराराला मान्यता देण्यात आली. 3. हे अधिवेशन राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमसाठी संस्मरणीय ठरले. 4. गांधीजीला कराचीमध्ये नवजीवन सदस्यांनी काळे झेंडे दाखविले.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 3. 
  प्र.3 गांधीजीची भेटीची मागणी फेटाळणारा पहिला व्हाईसरॉय कोण ? 1. लॉर्ड आर्यविन 2. लॉर्ड मिंटो 3. लॉर्ड कर्झन 4. लॉर्ड विलीग्डन
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 4. 
  प्र.4. कॉंग्रेसने कायदेमंडळाच्या निवडणुकांचा बहिष्कार मागे घेतला, त्याबाबत खालील पैकी काय सत्य आहे ? 1. बहिष्कार मागे घेतल्यानंतर प्रथमच १९३४ मध्ये केंद्रीय कायदेमंडळाच्या पाचव्या निवडणूकामध्ये कॉंग्रेसने सहभाग घेतला. 2. त्यावेळी कॉंग्रेसने 24 जागा मिळविल्या. 3. कॉंग्रेसचे केंद्रीय कायदेमंडळातील नेते म्हणून सरदार पटेल यांची नेमणूक करण्यात आली. 4. सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्याअगोदर कॉंग्रेसने ही निवडणूक लढविली.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 5. 
  प्र.5. तेजबहादूर सप्रू हे दुसऱ्या गोलमेल परिषदेला खालीलपैकी कोणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ? 1. कॉंग्रेसचे एकमेव अधिकृत प्रतिनिधी 2. हिंदू महासभा 3. लिबरल फेडरेशन 4. डीप्रेस्ड क्लासेस
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 6. 
  प्र.6 कराची अधिवेशनातील मुलभूत हक्कविषयक ठरावामध्ये खालीलपैकी कोणत्या मुलभूत हक्कांचा समावेश होता ? अ. कायद्यासमोर समानता ब. मोफत व अनिवार्य प्राथमिक शिक्षण क. भाषा व लिपींचे संरक्षण पर्याय:- 1. फक्त अ आणि ब 2. फक्त ब आणि क 3. फक्त अ आणि क 4. वरीलपैकी सर्व
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 7. 
  प्र.7 1 डिसेंबर 1931 रोजी खालील पैकी कोणत्या घोषणांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेचा शेवट करण्यात आला ? अ. एक मुस्लीम बहुसंख्य प्रांत स्थापन केला जाईल ब. भारतीयामध्ये एकमत न झाल्यास सरकार मार्फत स्वतःच जातीय निवाडा जाहीर करण्यात येईल. क. भारतीय सल्लागार समिती स्थापन केली जाईल. पर्याय:- 1. फक्त अ आणि ब 2. फक्त ब आणि क 3. फक्त अ आणि क 4. अ,ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 8. 
  प्र.8 पुणे करारावर खालीलपैकी कोणत्या दोघांनी सह्या केल्या ? 1.महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर 2. भुलाभाई देसाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर 3. महात्मा गांधी आणि तेजबहादूर सप्रू 4. वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 9. 
  प्र.9 सिमला परिषद १९४५ बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? 1. गांधीजी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे सदस्य नव्हते, ते परिषदेला गैरहजर होते, परिणामी त्यांनी परिषदेच्या चर्चेत सहभाग घेतला नाही. 2. गांधीजी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे सदस्य होते, ते परिषदेला हजर होते, परिणामी त्यांनी परिषदेच्या चर्चेत सहभाग घेतला नाही. 3. गांधीजी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे सदस्य होते, ते परिषदेला हजर होते,त्यांनी परिषदेच्या चर्चेत सहभाग घेतला. 4. वरीलपैकी नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 10. 
  प्र.10 खालील पैकी कोणी छोडो भारत चळवळीला विरोध केला/चळवळीला अनुकूल नव्हते ? अ.डॉ बाबासाहेब आंबेडकर ब. सी राजगोपालचारी क. तेजबहादूर सप्रू पर्याय:- 1.फक्त अ आणि ब 2. फक्त अ आणि क 3. फक्त ब आणि क 4. अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

Back to Top Back to top