1.
प्र.1 खालील जोड्या जुळवा.
गट I(डोंगर) गट II(शाखा)
अ. तसुमाई डोंगर i. दक्षिण महाराष्ट्रातील शाखा (डोंगर)
ब. निर्मळचे डोंगर ii. महादेव डोंगररांगा
क. चिकोडीचे डोंगर iii. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा
ड. बामणोलीचे डोंगर iv. सातमाळा अजिंठा डोंगररांगा
पर्याय:-
1. अ-ii,ब-iv,क-i,ड-iii
2. अ-iii,ब-iv,क-i,ड-ii
3. अ-iii,ब-i,क-iv,ड-ii
4. अ-iv,ब-iii,क-i,ड-ii
A. 
B. 
C. 
D. 
2.
प्र.2 खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा.
अ. हनुमान
ब. अस्तंभा
क. बैराट
ड. तौला
पर्याय:-
1. ड-ब-क-अ
2. ब-अ-क-ड
3. अ-क-ब-ड
4. अ-ब-क-ड
A. 
B. 
C. 
D. 
3.
प्र.3 खालील विवरणावरून खडक ओळखा.
अ. महाराष्ट्राच्या भूखंडाचा हा पायाभूत खडक आहे.
ब. नांदेड जिल्ह्यात या खडकाचे थर आढळतात.
क. यातील काळा दगड प्रमुख असून त्यास कृष्णप्रस्तर असे म्हणतात.
पर्याय:-
1. आर्कीयन कालखंडातील खडक
2. धारवाड कालखंडातील खडक
3. कडप्पा कालखंडातील खडक
4. गोंडवन कालखंडातील खडक
A. 
B. 
C. 
D. 
4.
प्र.4 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे तयार झालेली जलप्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ?
पर्याय:-
1. वृक्षाकार
2. समांतर
3. केंद्रत्यागी
4. अनिश्चित स्वरुपाची
A. 
B. 
C. 
D. 
5.
प्र.5 खालील नद्यांचा दक्षिण ते उत्तर असा क्रम लावा.
अ. अंबा
ब. गांधार
क. काजळी
ड. जगबुडी
पर्याय:-
1. अ-ब-क-ड
2. अ-क-ब-ड
3. अ-ब-ड-क
4. ब-अ-क-ड
A. 
B. 
C. 
D. 
6.
प्र.6 महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून धडकनणे यास काय म्हणतात ?
1. मान्सूनचा स्फोट होणे
2. पावसाळा सुरु होणे
3. मृगनक्षत्र सुरु होणे
4. कोकणात पाऊस पडणे
A. 
B. 
C. 
D. 
7.
प्र.7 महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर ६०० सेमी इतका पाऊस पडतो, चंद्रपूर भंडारा परिसरात तो 150 सेमी इतका पडतो, तर अहमदनगर सोलापूर याभागातील पावसाचे सरासरी प्रमाण ...... इतके आहे.
1. 10 सेमी
2. 20 सेमी
3. 50 सेमी
4. 80 सेमी
A. 
B. 
C. 
D. 
8.
प्र.8 पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनात खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?
अ. मृदा आणि जलसंधारण
ब. इंधन व चारा योजनेत सुधारणा
क. जमिनीच्या क्षमतेनुसार उपयोग
ड. पशुधन योजनेत प्रगती
पर्याय:-
1. फक्त क
2. फक्त अ आणि क
3. फक्त अ, क आणि ड
4. वरीलपैकी सर्व
A. 
B. 
C. 
D. 
9.
प्र.9 ........ या वनांना “मोसमी वने” असेही म्हणतात.
1. शुष्क प्रदेशातील काटेरी वने
2. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने
3. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने
4. यापैकी नाही
A. 
B. 
C. 
D. 
10.
प्र.10 पांढरी मातीचे सुद्धा खनिजाप्रमाणे अनेक उपयोग आहेत. महाराष्ट्रात पांढरी माती खालीलपैकी कोठे सापडते ?
1. मालवण,कुडाळ,कणकवली
2. आग्री, तुमसर, कवडसी
3. दाभोळ, पूर्णगड,देवरुख
4. आमगाव,देवरी
A. 
B. 
C. 
D. 
11.
प्र.11 “बिन्दीबु” हे लोक कोणत्या देशातील निवासी आहेत ?
1. कॅनडा
2. दक्षिण अमेरिका
3. उत्तर युरोप
4. ऑस्ट्रेलिया
A. 
B. 
C. 
D. 
12.
प्र.12 जगातील सर्वात मोठा “गंधक” पदार्थाचा उत्पादक देश कोणता ?
1. युएसए
2. रशिया
3. जपान
4. मेक्सिको
A. 
B. 
C. 
D. 
13.
प्र.13. डिसेंबरमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सौरउर्जा प्राप्त होते ?
1. जयपूर
2. दिल्ली
3. अमृतसर
4. चेन्नई
A. 
B. 
C. 
D. 
14.
प्र.14 भगीरथी आणि अलकनंदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळतात आणि तेथे गंगा नदी निर्माण करतात ?
1. कर्ण प्रयाग
2. देव प्रयाग
3. रुद्र प्रयाग
4. गंगोत्री
A. 
B. 
C. 
D. 
15.
प्र.15 केदारनाथ सोबत वाहणारी नदी मंदाकिनी ही कोणत्या नदीची सहायक नदी आहे ?
1. भगीरथी
2. भिलगना
3. अलकनंदा
4. देवगंगा
A. 
B. 
C. 
D. 
16.
प्र.16. शिलकीच्या अंदाजपत्रकाविषयी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?
अ. आर्थिक तेजीच्या काळात हे अंदाजपत्रक प्रभावी ठरते.
ब. या अंदाजपत्रकामुळे सरकारवरचे कर्ज कमी होते.
पर्याय:-
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही.
A. 
B. 
C. 
D. 
17.
प्र.17 खालीलपैकी मध्यवर्ती बँकेचे कार्य कोणती ?
अ. देशाच्या परकीय चलनसाठ्यांचा सांभाळ करणे
ब. विनिमय दरातील स्थैर्य टिकवून ठेवणे.
क. सरकारची बँक म्हणून कार्य करणे.
पर्याय:-
1. फक्त अ आणि ब
2. फक्त ब आणि क
3. फक्त अ आणि क
4. वरीलपैकी सर्व
A. 
B. 
C. 
D. 
18.
प्र.18 खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?
अ. व्याजदर आणि गुंतवणुकीसाठी केलेली मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो.
ब. "स्वायत्त गुंतवणूक" ही व्यवसायातील नफ्याशी प्रत्यक्ष निगडित नसते.
पर्याय:-
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही.
A. 
B. 
C. 
D. 
19.
प्र.19 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या “उत्पादन” पद्धतीविषयी खालीलपैकी काय खरे नाही ?
1. या पद्धतीची विश्वासार्हता कमी आहे.
2. अविकसित देशामध्ये क्वचितच यापद्धतीचा वापर केला जातो.
3. या पद्धतीत “वाहतूक” या घटकाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत नाही.
4. वरीलपैकी सर्व विधाने खरी आहेत.
A. 
B. 
C. 
D. 
20.
प्र.20 “समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय “ ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली ?
1. डॉ. मार्शल
2. फिशर
3. प्रा. पिंगू
4. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती
A. 
B. 
C. 
D. 
21.
प्र.21. समग्रलक्षी अभ्यासक्रमात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो ?
अ. संपूर्ण अर्थव्यवस्था
ब. राष्ट्रीय उत्पन्न
क. वस्तूची किंमत निश्चिती
ड. समग्र पुरवठा
पर्याय:-
1. फक्त अ आणि ब
2. फक्त अ, ब, आणि ड
3. फक्त ब आणि ड
4. वरीलपैकी सर्व
A. 
B. 
C. 
D. 
22.
प्र.22 भारताची आर्थिक पाहणी अहवाल २०१७-१८ बाबतील खालील विधाने वाचा.
अ. हा पाहणी अहवाल हिरव्या रंगात सादर करून त्याद्वारे लिंगभाव समानतेच्या मुद्द्याला अधोरेखित करण्यात आले.
ब. २०१६-१७ चा आर्थिक वाढीचा दर हा 7.4 टक्के इतका होता.
वरीलपैकी सत्य विधाने कोणती ?
पर्याय:-
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. एकही नाही
A. 
B. 
C. 
D. 
23.
प्र.23भारतातील बहुतेक पालकामध्ये अजूनही मुलगे होण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे असा यावर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल निर्देशित करतो. या अहवालात खालीलपैकी कोणत्या दोन देशातील जन्मजात लिंग दराची तुलना केल्याचे दिसून येते ?
1. भारत-चीन
2. भारत-सिंगापूर
3. भारत-इंडोनेशिया
4. भारत-श्रीलंका
A. 
B. 
C. 
D. 
24.
प्र.24 भारतीय अर्थसंकल्प २०१८-१९ सादर करतेवेळी वित्तमंत्र्यांनी कोणत्या झाडाला “हरित सोने” असे संबोधले ?
1. नारळ
2. चहा
3. कापूस
4. बांबू
A. 
B. 
C. 
D. 
25.
प्र.25 खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी वित्तमंत्री म्हणून काम केले आहे ?
अ. मोरारजी देसाई
ब. चौधरी चरणसिंग
क. व्ही पी सिंग
ड. मनमोहन सिंग
पर्याय:-
1.फक्त अ आणि ड
2. अ-ब-ड
3. अ-क-ड
4. अ-ब-क-ड
A. 
B. 
C. 
D.